Monday, January 30, 2023

अजित पवारांनी सत्तेचा गैरवापर करून जरंडेश्वर कारखाना लाटला; शालिनीताई पाटलांचा आरोप

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना ईडी ने जप्त केला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या अनुषंगाने या कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान जरंडेश्वर कारखान्याच्या संस्थापक आणि माजी संचालक शालिनीताई पाटील यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी सत्तेचा गैरवापर करुन आपल्याकडून कारखाना बळकावल्याचा आरोप केला आहे.

आमच्या कारखान्यावर कर्जाचा हफ्ता केवळ 3 कोटींचा असताना त्यांनी विकला. वास्तविक पाहता आमच्या खात्यात 8 कोटी रुपये होते. मात्र बँकेत अजित पवार, खरेदी करणारे अजित पवार त्यामुळे आम्ही काही करु शकलो नाही. त्यांनी सत्तेचा पुरेपूर वापर केला. त्यांनी 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला अस म्हणत देवाच्या काठीला आवाज नसतो. शंभर अपराध भरले की फटका बसतोच असा टोला त्यांनी लगावला.

- Advertisement -

अजित पवारांचा संबंध कसा ??

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना लिलावात ‘गुरू कमोडिटी’ या कंपनीने खरेदी के ला होता. या कंपनीने हा कारखाना लगेचच जरंडेश्वार शुगर्स या कंपनीला भाडेतत्त्वावर दिला होता. या कं पनीत ‘स्पार्क लिंग सॉईल प्रा. लिमिटेड’ या कंपनीचा मोठा हिस्सा आहे. स्पार्क लिंग कंपनी ही अजित पवार व त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचे ‘ईडी’चे म्हणणे आहे.

अजित पवार काय म्हणतात

जरंडेश्वर कारखाना संचालक मंडळाने विकलेला नसून उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विक्री करण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे