शिवसेनेतून पहिली बंडखोरी शंभूराजे देसाई अन् शहाजी पाटलांची?? खुद्द आमदारानेच दिली कबुली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी तब्बल 40 हुन अधिक समर्थक आमदारांसह बंड केलं. एकामागून एक आमदार शिंदेंच्या गोटात जात असून सर्वप्रथम कोण फुटलं याच उत्तर आता समोर आले आहे. बंडखोर आमदार शहाजी पाटील यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप मध्ये सुरत मध्ये सर्वप्रथम पाऊल ठेवणारे शंभूराजे देसाई आणि शहाजी पाटील होते अस ते आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना सांगत असल्याचे दिसत आहेत.

सदर ऑडिओ क्लिपमध्ये शहाजी पाटील म्हंटल आहे की, मी आणि शंभूराजे देसाई आम्ही दोघांनी सर्वात आधी एकनाथ शिंदे यांच्या सोबत सुरतच्या दिशेने पावलं वळवली. पहिल्यांदा एन्ट्री आम्हा दोघांच्या आहेत. तिथेच मी शंभूराजे देसाई यांना म्हंटल की आपला लढा १०० टक्के यशस्वी होणार.

राज्यात शिवसेनेची सत्ता असूनही निधी मिळवण्यासाठी अडचणी होत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसमुळे भविष्यात मोठा परिणाम होईल याची खात्री सर्वाना माहीत होते. उद्या निवडणुकांमध्ये हे राष्ट्रवादीवाले मतदारसंघ देखीव ठेवतील का नाही अशी भावना प्रत्येकाची झाली आहे. त्यामुळे ती वेळ येण्यापूर्वीच हे पाऊल उचलणे गरजेचे आहे. त्यामुळे आता सर्वकाही सुरळीत होणार असल्याचा विश्वास शहाजी बापूंनी आपल्या कार्यकर्त्याला दिला आहे.

Leave a Comment