पाटण गोळीबार प्रकरणी शंभूराज देसाईंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यातील गुरेघर येथील शिंद्रुकवाडीमध्ये रविवारी रात्री पवनचक्कीच्या जुन्या व्यवहाराच्या वादातून गोळीबाराची घटना घडली. यामध्ये ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम याने श्रीरंग जाधव आणि सतीश सावंत याच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकरणी उत्पादन शुल्कमंत्री तथा आमदार शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या लोकांवर गोळीबार झाला त्यांचे व कदमचे जमिनीच्या व्यवहारावरून वाद सुरु होते. त्याबाबत तक्रारही पोलीस ठाण्यात दाखल होती. मात्र, कदम याने गोळीबार केल्याने दुर्दैवाने आमच्या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. या प्रकारणी पोलीस तपास करत असल्याचे देसाई यांनी सांगितले.
मुंबईत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून या अधिवेशनात आज राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी पाटण येथील गोळीबाराच्या घटनेचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर विधीमंडळाच्या बाहेर येत मंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ज्या लोकांवर गोळीबार झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला या लोकांचे वजमिनीच्या व्यवहारावरून वाद सुरु होते. अशात एकमेकांना गाड्या आडव्या घालणे, ओव्हरटेक करताना गाडी घासणे आदी प्रकरणी पोलीस कारवाई करत होते.

Crime News : पाटण गोळीबार प्रकरणी शंभुराज देसाईंची प्रतिक्रिया

काल अचानक मदन कदम नावाच्या व्यक्तीने जो गोळीबार केला. त्यामध्ये दुर्दैवाने आमच्या दोन कार्यकर्त्याचा- दोन लोकांचा मृत्यू झाला तर तिसऱ्या व्यक्तीला गोळी लागलेली आहे. त्याच्यावरती उपचारही सुरु आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेथून गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. तसेच त्या ठिकाणी असणारे साहित्य, हत्यारे जप्त केले आहेत. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा देखील दाखल केलेला आहे. यांच्यामध्ये निश्चितच कडक स्वरूपाची कारवाई पोलीस करतील, असे देसाई यांनी म्हंटले.