उद्धव ठाकरेंच्या कामकाजावर पवारांनी व्यक्त केलेली खंत योग्यच : मंत्री शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे 2 ते 3 वेळाच मंत्रालयात जायचे हे मला पचनी पडत नव्हते असं त्यांच्या ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकात लिहले आहे. यावर शिंदे गटाचे नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. उध्दव ठाकरे हे मंत्रालयात कमी यायचे. मंत्रिमंडळाचा बैठका उपमुख्यमंत्री आणि आम्ही मंत्री घ्यायचो. त्यामुळे शिस्तबध्द काम करणाऱ्या शरद पवार यांना उद्धव ठाकरे यांच्या कामाबद्दल खंत वाटणे योग्यच आहे, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हंटले.

मंत्री शंभूराज देसाई यांनी साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शरद पवार यांच्याबाबत सांगायचे झाले तर त्यांचे कार्यालयीन कामकाज सर्वांना माहिती आहे. ते मंत्री होते, केंद्रीय मंत्री होते.

शरद पवार साहेब कार्यालयीन कामकाजासाठी जास्त वेळ द्यायचे. ही पवार साहेबांच्या कामाची पद्धत आहे ती अजितदादांनी पुढे चालवली आहे. त्यामुळे अशा प्रकारे शिस्थबद्द काम करणाऱ्या पवार साहेबांना खंत वाटणे स्वाभाविक आहे.