शंखनाद आंदोलन – आमदार सावेंसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – सध्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले होते. सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असून तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. सध्या शाळा महाविद्यालय आणि धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर गजानन मंदिर परिसरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी 30 ऑगस्ट रोजी शंखनाद आंदोलन छेडले होते.

यावेळी मंदिर उघडण्यास परवानगी देत नसलेल्या ठाकरे सरकार विरोधात भाजपने शंख वाजवून शहरातील गजानन मंदिरासमोर शंखनाद घंटानाद आंदोलन केले होते. याप्रकरणी आता कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार अतुल सावे यांच्यासह आंदोलनकर्त्या पदाधिकाऱ्यांवर जवाहर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आमदार अतुल सावे, भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर, प्रवीण घुगे, मंगलमूर्ती शास्त्री, जालिंदर शेंडगे, संजय जोशी, राजेश मेहता, मनोज भारस्कर, गोविंद केंद्रे, बसवराज मंगरुळे, लक्ष्मीकांत थेटे, अशोक दामले, शिवाजी दांडगे, ताराचंद गायकवाड यांच्यासह पाच महिला कार्यकर्त्यांविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment