हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ग्रामीण भागात शेती करत असताना आज अनेक तरुण शेतीसोबत इतरही जोडधंदा करत आहेत. त्यातूनही चांगले पैसे कमवत आपले जीवनमान सुधारत आहेत. असाच एक झिरो बचत पद्धतीचा खेकडे पालनाचा व्यवसाय पुणे जिल्ह्यात ओतूर-मेंगाळवाडी येथील शांताराम व सतीश या वारे बंधूंनी सुरु केला आणि एक गुंठे क्षेत्रातून जवळपास ते 60 हजार रुपये नफा कमवू लागले आहेत.
पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावात राहत असलेल्या शांताराम व सतीश या वारे बंधूंची केवळ दीड एकर शेती आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीसाठी ते सक्षम पर्याय शोधत होते. शेतीसोबत जोडव्यवसाय करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आज ते खेकडे पालन करून त्याच्यापासून खाद्य पदार्थ बनवून त्याच्या विक्रीतून महिन्याला 60 हजार रुपये कमवू लागले आहेत.
शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, शेळी, कोंबडीपालन हे व्यवसाय प्रचलित आहेत. मात्र खेकडे व्यवसायांमध्ये कमी गुंतवणूक व कष्टही कमी आहेत. अशाच प्रकारे तुम्हालाही अनेक जोड व्यवसाय करून त्यापासून उत्पन्न वाढवायचे असेल आणि त्याबाबतच्या माहितीबाबत अडचण येत असेल तर चिंता करू नका. गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे अँप Download करून Install करा. त्यामध्ये तुम्हाला जोड व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून योजनेद्वारे केले जाणारे अर्थसहाय्य्यच्या योजना, यशो व कृषी व्यवसाय याबाबत माहिती मिळू शकेल. याव्यतिरिक्त Hello Krushi च्या माध्यमातून तुम्ही स्वतः पिकवलेला शेतमाल, पशुधन तुम्हाला हव्या त्या किमतीत विकता सुद्धा येऊ शकेल. त्यासाठी हॅलो कृषी डाउनलोड करा.
Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here
अभ्यासातून प्रयोग सुरू
वारे यांनी इंटरनेट तसेच अन्य स्रोतांमधून खेकडापालनाची तसेच मासळी बाजारपेठेत जाऊन बाजारपेठ, दर यांची माहिती घेतली. वारे यांना गोड्या पाण्यातील खेकडापालनाविषयी फार कमी माहिती उपलब्ध झाली. मग त्यांनी आपल्या घराजवळच कल्पकतेने 20 बाय 15 फूट लांबी-रुंदीची व चार फूट खोलीची टाकी बनवली. त्याच्या बाजूस 15 बाय सहा फूट आकाराची दुसरी छोटी टाकी बनवली. या छोट्या टाकीत पूर्ण पाणी भरून ठेवले जाते. तर मुख्य टाकीत अर्धा फूट पाणी सोडून त्यात खेकडे पालन सुरु केले. त्यांनी मुख्य टाकीत तळाला माती आणि वाळू थोड्या प्रमाणात टाकली. खेकड्यांना आसऱ्याची जागा म्हणून फुलदाणीच्या 20 ते 25 कुंड्या तसेच पाण्यात वाढणाऱ्या गवताचे मोठे गठ्ठेही ठेवले.
खेकड्याच्या 1 मादीपासून 500 ते 1 हजार पिले
खेकड्यांचे बीज व पैदास पिंपळगाव जोगा धरणातून पिंजऱ्यात खेकडे पकडणाऱ्या व्यक्तींकडून छोटे खेकडे व पिले विकत घेतली. ती टाकीत सोडून त्यांचे संगोपन सुरु केले. खेकड्याची एक मादी सुमारे पाचशे ते एक हजार पिले देते. त्यामुळे खेकड्यांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. सर्वसाधारण वर्षभरानंतर खेकडा विक्रीयोग्य होतो. प्रति खेकड्याचे वजन २०० ग्रॅमपर्यंत असते. साधारण चार ते पाच खेकड्यांचे वजन एक किलोच्या आसपास भरते. खेकडे ठेवलेल्या टाकीतील पाणी साधारण पंधरा दिवसांतून एकदा बदलावे लागते. त्यासाठी छोट्या टाकीतून पाणी घेण्याची व्यवस्था केली आहे.
अशा प्रकारे केली खेकड्यांच्या विक्रीची मार्केटिंग
खेकडे पैदास केल्यानंतर वारे बंधूंनी त्याच्या विक्रीसाठी एका चांगला पर्याय शोधला. त्यांनी आपल्याकडील खेकड्यांचे मार्केटिंग व्हॉटसॲप ग्रुपद्वारे करण्यास सुरुवात केली. त्यानुसार ग्राहकांकडून चौकशी होऊ लागली. आज तीनशे रुपये प्रति किलो दराप्रमाणे जिवंत खेकड्याची विक्री केली जात आहे. पूर्वी दिवसाला १० किलोपर्यंत खप ते करायचे आता हीच संख्या 30 ते 35 किलोपर्यंत पोचली आहे. बाजारात नेऊन विक्री करण्याची गरज भासत नसून ग्राहक स्वतः संपर्क करून घरूनच खेकडे विकत घेऊन जातात. या व्यवसायात सुमारे 50 ते 60 टक्के नफा होत आहे.
खेकडा भाजीनिर्मितीतूनही उत्पन्न वाढले
वारे बंधूंनी खेकड्याच्या विक्रीबरोबरच खाद्याचा जोडधंदाही सुरु केला. खेकड्याचे सूप, सॅलड, स्टार्ट्स आणि भाजी आदी वेगवेगळ्या प्रकारांतून ते खेकड्याचे पदार्थ बनवून लागले. तसेच खेकडा व रस्साभाजीदेखील बनवून त्याच्या विक्रीही ते करू लागले आहेत. त्यास ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. पाचशे रुपये प्रति किलो खेकडा भाजी डिश असा दर ठेवला आहे.