कोकणाचा कॅलिफोर्निया व्हावा ही पवारसाहेबांची इच्छा – अजित पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोकणाबद्दल प्रेम आहे आणि या परिसराचा कॅलिफोर्निया करावा, अशी त्यांची इच्छा आहे असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. अजित पवार हे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासोबतच विकास कामांचा देखील आढावा घेतला.

शरद पवारांनी अनेक हल्ले , वादळं, दुष्काळ, गारपीट पाहिली, पण त्यातून न डगमगता राज्यातील जनतेला उभं करण्याचं काम केलं. कोकणाबद्दल पवार साहेबाना प्रेम आहे. या परिसराचा कॅलिफोर्निया करावा, अशी त्यांची इच्छा आहे. राज्य सरकारने निधी देण्याचं काम केलं. मुंबई गोवा महामार्गावर फॉरेस्टची अडचण आहे. काम रखडलंय, आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करतोय, लवकरच काम होईल अशी अपेक्षा आहे असं अजित पवार यांनी म्हंटल.

अदिती तटकरे यांचे काम चांगले आहे, त्या जर कमी पडल्या तर त्यांचे वडील म्हणजेच राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे कामं करुवून घेतात. अदिती माझी मुलगी, पै पै कामासाठी खर्च झाले पाहिजे, असा प्रेमल दम यावेळी अजित पवारांनी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना दिला. ब्रिटिशांचं काम टिकतं आपलं का टिकत नाही, असा सवालही त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment