अजितदादांना पद का दिलं नाही? शरद पवारांनी सगळंच सांगितलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या २५ व्या वर्धापनदिनाचे निमित्त साधून कार्याध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड केली. पवारांच्या या निर्णयानंतर अजित पवार यांच्यावर अन्याय झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र अजित पवार यांच्या ऐवजी सुप्रिया सुळे यांची निवड आपण का केली याचे कारण स्वतः शरद पवार यांनीच सांगितलं आहे. ते दिल्लीतील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

सुप्रिया सुळे यांची निवड हा माझा एकट्याचा निर्णय नाही. लोकांच्या आग्रहाखातर सुप्रिया सुळे याना अध्यक्ष केलं, सुप्रिया सुळे यांच्यावर यापूर्वी कोणती जबाबदारी नव्हती. दुसरीकडे अजित पवार हे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे आणि जयंत पाटील हे सुद्धा महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत असं पवारांनी म्हंटल.

चर्चेतून सहकाऱ्यांना जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला. महिन्यात ४ वेळा इतर राज्यातील संघटना वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. जेणेकरुन आम्ही आगामी लोकसभे निवडणुकीपर्यंत लोकांपर्यंत पोहोचू, असं शरद पवार यांनी सांगितलं.

दरम्यान, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे या दोघांनाही पक्षाचे कार्याध्यक्ष बनवण्यता आल्यानंतर राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण होणार अशी गुगली पत्रकारांनी टाकताच पवारांनी त्या चेंडुवरही चांगलाच स्ट्रेट ड्राइव्ह लगावला. राष्ट्रवादी अध्यक्षपदाची जागा अजून खाली झालेली नाही. ही जागा खाली झाल्यावर विचार केला जाईल असं उत्तर पवारांनी दिले.