Saturday, March 25, 2023

शरद पवार ऍक्शन मोड मध्ये ; दिल्लीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक होणार

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीसारखे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत आले असून आता स्वतः शरद पवार हे ऍक्शन मोड मध्ये आले आहेत. पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक होणार आहे.

शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आज संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यावेळी गृहमंत्री बदलण्याविषयी चर्चा होणार आहे. तसेच परमबीर सिंग यांच्या आरोपातील सत्यतेबाबतही चर्चा करण्यात येणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, लेटर बॉम्बनंतर पवारांनी देशमुखांशी फोनवरून चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यानंतर अजित पवार आणि जयंत पाटलांशीही पवारांनी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी या दोन्ही नेत्यांना दिल्लीत पाचारण केल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group