शिंदेंच्या बंडावर शरद पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला झटका देत भाजपशी सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री ठाकरेंकडे पाठवला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापनेच्यावेळी असाच प्रयत्न झाला होता. अडीच वर्षात तिसऱ्यांदा प्रयत्न झाला. आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केले आहे. हा त्याचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, सत्तेचा या पेचातूनही तोडगा निघेल, असे पवार यांनी म्हंटले.

शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात जे झालं ते जगाच्या समोर आहे. ही पूर्ण फसवणूक आहे. हा दुसऱ्यांदा झालेला प्रकार आहे. आधीही आमचे आमदार हरयाणात हलवले होते. तेच आमदार पुन्हा आले. मात्र, एक गोष्ट लक्षात घ्यावी कि, अडीच वर्षे सरकार नीट चालल आहे. राष्ट्रवादीच एकही मत इकडे तिकडे गेले नाही कालच्या मतदानामुळे आमच्यात कोणी नाराज नाही. आमच्या मित्रपक्षाचा एक उमेदवार निवडून येऊ शकलेला नाही.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/559940822354711

आम्ही परत गेल्यावर आमच्या सहकान्यांशी बोलू. येथील स्थिती पाहून काही ना काही मार्ग निघेल. कोण बोललं असेल मला मुख्यमंत्री बनवा पण शिवसेनेकडेच मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे. कोण बोललं असेल मला मुख्यमंत्री बनवा पण शिवसेनेकडेच मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे. उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादीची आहे. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे मुख्यमंत्री बदलायचा असेल तर त्यांचा निर्णय आहे. मात्र उद्धव ठाकरेंचं नेतृत्व बदलण्याची आम्हाला त्याची गरज वाटत नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

Leave a Comment