व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पवारांकडून मोदींच्या मातोश्रींची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना; पत्र पाठवत म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबेन (Heeraben Modi) मोदी यांची तब्ब्येत अचानक बिघडल्याने त्यांना अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मोदी स्वतः काल त्यांना भेटायला गेले होते. देशभरातील नेतेमंडळी मोदींना कॉल करून किंवा पत्राच्या माध्यमांतून त्यांच्या मातोश्रींच्या तब्ब्येतीची चौकशी करत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही मोदींना पत्र पाठवून हिराबेन मोदी यांच्या तब्ब्येतीची विचारपूस केली आहे आणि लवकरात लवकर बरं होण्यासाठी प्रार्थनाही केल्या आहे.

पवारांनी आपल्या पत्रात म्हंटल, अहमदाबाद येथील रुग्णालयात तुमच्या मातोश्रीना दाखल करण्यात आले आहे. तुम्ही काल रुग्णालयात जाऊन त्यांची भेटही घेतली. त्यांची प्रकृती स्थिर असून त्या बऱ्या होत आहेत हे जाणून मला दिलासा मिळाला आहे. तुमचे तुमच्या प्रिय आईशी किती जवळचे आहे नाते आहे हे मला माहीत आहे आणित्यामुळे तुमच्या आयुष्यातील या कठिण प्रसंगाची मला जाणीव आहे असं शरद पवार म्हणाले.

पवार आपल्या पत्रात पुढे म्हणतात, आई हा पृथ्वीवरील सर्वात पवित्र आत्मा आहे. तुमच्या जीवनाला आकार देण्यासाठी तुमची आई ऊर्जा आणि निरंतर शक्तीचं स्त्रोत राहिल्या आहेत. मी त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. असं त्यांनी म्हंटल तसेच मोदींना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही या पत्राच्या माध्यमातून शरद पवारांनी दिल्या.

मोदींच्या आई हिराबेन मोदी यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने काल अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मोदींनी स्वतः रुग्णालयात जाऊन आईची भेट घेतली. यावेळी रुग्णालयाबाहेर येताच त्यांनी गाडीतून उपस्थितांना हात जोडून नमस्कारही केला होता.