शरद पवारांचा एक महाराष्ट्र दौरा … अन् राष्ट्रवादी सत्तेत येते

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातील चाणक्य समजले जातात. पवार कधी कोणती खेळी खेळतील हे भल्याभल्याना समजत नाही. त्यातच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पवारांबाबत एक मोठं विधान केलं आहे. शरद पवार यांचा एक महाराष्ट्र दौरा आणि त्यानंतर राष्ट्रवादी सत्तेत येतेच असं सुप्रिया सुळे यांनी म्हंटल आहे. इंदापूर येथील एका आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या. मी शरद पवार यांना नेहमी सांगते की, महाराष्ट्राने तुम्हाला प्रचंड प्रेम दिले. पण विरोधी बाकांवर असताना जनतेने तुम्हाला जास्त प्रेम दिले. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. विरोधात आल्यानंतर शरद पवार राज्याच्या दौऱ्यावर निघतात. त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते ते माहिती नाही. पण तो दौरा झाला की शरद पवार पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

त्या पुढे म्हणाल्या , निवडणुकीत पडझड ही होतच असते, आम्ही सुद्धा ती जवळून बघितली आहे . तुम्ही जर शरद पवार यांचं राजकारण आणि समाजकारण जर पाहिले तर ५५ वर्षाच्या काळात जेवढे चढ आलेत तेवढेच उतार आहेत. ५५ वर्षांपैकी २७ वर्ष सत्तेमध्ये आणि २७ वर्षे विरोधात गेली आहेत. ते विरोधक असतानाच महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना जास्त प्रेम दिले आहे, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं .