Sharad Pawar Meet Baba Adhav : शरद पवार पूना रुग्णालयात दाखल; बाबा आढाव यांच्या प्रकृतीची विचारपूस

Sharad Pawar Meet Baba Adhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Sharad Pawar Meet Baba Adhav । ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची प्रकृती बिघडली असून त्यांना पूना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाबा आढाव यांचावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. यादरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पूना हॉस्पिटल मध्ये जाऊन बाबा आढाव यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

खरं तर मागील १० दिवसांपासून बाबा आढाव यांच्यावर पूना रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन बाबा आढाव यांची भेट (Sharad Pawar Meet Baba Adhav) घेतली. बाबा आढाव यांच्यावर सध्या त्यांच्यावर हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य व तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आवश्यक ते उपचार चालू आहेत. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना आय.सी.यू. मध्ये ठेवण्यात आले आहे. आज आत्ता प्रकृती काळजी करण्यासारखी पण स्थिर आहे, असे बाबा आढाव यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

बाबा आढाव कोण आहेत Sharad Pawar Meet Baba Adhav

1970 च्या दशकात डॉ. बाबा आढाव पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. तात्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि रिक्षा पंचायतीने नेते म्हणूनही काम करत होते. ‘एक गाव एक पाणवठा’ नावाची मोहिम चालवली जात होती. बाबा आढाव त्याचे प्रणेते होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची मोठी ओळख आहे. ते 94 वर्षांचे आहेत. मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत महायुतीला मोठं यश मिळालं . परंतू ईव्हीएममध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप करत बाबा आढाव यांनी ३ दिवसांसाठी आत्मक्लेश उपोषण केले होते. त्यावेळीही शरद पवार यांनी उपोषणस्थळी जाऊन बाबा आढाव यांची भेट घेतली होती.