पवार ते पवारच! रात्री 11 ला MPSC आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीला अन् तेथूनच थेट मुख्यमंत्र्यांना फोन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात गेल्या 2 दिवसांपासून MPSC विद्यार्थ्याचं आंदोलन सुरु आहे. विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही रात्री 11  वाजता आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करणार असं आश्वासन दिले. शरद पवारांनी थेट आंदोलक स्थळावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना फोन लावला. त्यानंतर येत्या 2 दिवसात याबाबत चर्चा करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असल्याचे पवार म्हणाल.

काल रात्री 11 वाजता एमपीएससी आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली. पवार थेट विद्यार्थ्यांच्या गराड्यात गेल्याने विद्यार्थ्यांच्या अंगातही उत्साह संचारला. आणि पवारांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. महाराष्ट्राचा बुलंद आवाज… शरद पवार …शरद पवार या नाऱ्याने संपूर्ण परिसर दुमदुमला. शरद पवारांनी तेथूनच थेट एकनाथ शिंदे याना फोन लावला. शिंदेंनी सुद्धा यावर २ दिवसात बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तुमचा प्रश्न मार्गी लावणार असं पवार म्हणताच विद्यार्थ्यांनी जल्लोष केला आणि आपलं उपोषण स्थगित केले.

मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीला उपस्थित राहून विद्यार्थ्यांची बाजू मांडण्यासाठी एका शिष्टमंडळाने आपल्यासोबत यावं असं शरद पवारांनी सांगितलं. मी सुद्धा या बैठकीला येणार आहे असेही ते म्हणाले. शरद पवारांच्या आवाहनानंतर आंदोलक विद्यार्थ्यांपैकी पाच जणांचं शिष्टमंडळ हे त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहे. शरद पवार यांच्या या आश्वासनानंतर एमपीएससी विद्यार्थ्यांनी उपोषण स्थगित केले आहे मात्र आंदोलन सुरूच राहणार ठेवणार विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलं आहे.