ममता बँनर्जींच्या जबरदस्त विजयावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमुल काँग्रेस 200+ जागांवर आघाडीवर आहे. यामुळे ममता बँनर्जी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ममता बँनर्जीं आपल्या जबरदस्त विजयाबद्दल तुमचे अभिनंदन असं पवार म्हणालेत.

आपल्या जबरदस्त विजयाबद्दल ममताजी आपले अभिनंदन! लोकांच्या कल्याणासाठी आणि साथीच्या आजाराला सामोरे जाण्यासाठी आपण आपले कार्य चालू ठेवूया अशा आशयाचे ट्वित शरद पवार यांनी केले आहे.

दरम्यान, विधानसभेच्या 294 जागांसाठी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान झाले होते. या निवडणुकीत ममतांचा तृणमूल काँग्रेस की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजप, यापैकी कोण बाजी मारणार, याचा फैसला आज होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत पश्चिम बंगाल काबीज करायचाच या इर्षेने भाजपने आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा या निवडणुकीत उतरवली होती. तर अस्तित्त्वाची लढाई लढत असलेल्या ममता बॅनर्जी यादेखील चवताळून भाजपशी दोन हात करण्यासाठी ठामपणे उभ्या ठाकल्या होत्या. आता आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार ममता २०० हुन अधिक जागांवर आघाडीवर आहेर्त. त्यामुळे ममतांचा विजय निश्चित मानला जात आहे.

 

You might also like