उद्या माझी इच्छा झाली तर??? ; जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवर शरद पवारांचा स्ट्रेट ड्राइव्ह
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कालच त्यांचं मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली होती. दरम्यान जयंत पाटलांच्या या स्वप्ना विषयी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारले असता
त्यांनीही लौकिकाला साजेशी मिश्किल प्रतिक्रिया दिली. ‘उद्या मला वाटलं तर काय करु?’ असा प्रतिप्रश्न करत शरद पवारांनी पत्रकारालाच क्लीन बोल्ड केले.
कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी विविध प्रश्नांवर आपली प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान, जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यास पत्रकाराने सुरुवात केली. त्यावर “मग काय झालं काय?” असा उलट प्रश्न पवारांनी विचारला. “काही संधी आहे का?” असं विचारत पत्रकाराने आपला प्रश्न पूर्ण केला. तेव्हा “उद्या मला वाटलं तर काय करु? मला कोणी करणार नाही, म्हणून मला वाटत नाही” अशी मिश्किल टिप्पणी शरद पवारांनी केली.
नक्की काय म्हणाले जयंत पाटील –
दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र सध्या आमच्या पक्षाकडे ते पद नाही. प्रथम पक्ष आणि आमदारांची संख्या वाढवावी लागेल. त्यानंतर पक्ष आणि खासदार शरद पवार जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असं आपण म्हटल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’