व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शिवाजी महाराज आपल्या प्रेरणास्थानी, दिल्लीसमोर झुकणार नाही- शरद पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपल्याला सर्वाना प्रेरणा मिळालेली आहे, त्यामुळे दिल्लीसमोर आपण झुकणार नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याची भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्ली येथील तालाकटोरा मैदानात राष्ट्रवादीचे आठवे अधिवेशन सुरू आहे. यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

शरद पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारातून आम्हांला प्रेरणा मिळते. शिवरायांनी आम्हाला एक गोष्ट शिकवली ती म्हणजे दिल्ली समोर झुकायचं नाही त्या शिकवणीनुसार मी दिल्ली समोर झुकणार नाही, असे म्हणत शरद पवार यांनी मोदी सरकारविरोधात लढण्याचा कानमंत्र दिला. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. त्याविरोधात लढण्याची तयारी सर्वांनी ठेवली पाहिजे. देशात नक्कीच परिवर्तन होईल, असं शरद पवार म्हणाले.

यावेळी शरद पवारांनी महागाई , बेरोजगारीवरून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. देशात महागाई वाढली आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत. मागील वर्षी केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात याच दिल्लीत शेतकऱ्यांनी ठिय्या देत आंदोलन केलं होतं. केंद्र सरकार शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकण्यास तयार नव्हतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही शेतकरी वर्ग आणि कृषी क्षेत्राच्या हिताचं रक्षण करते. शेतकऱ्यांसाठी वारंवार लढण्याची वेळ आली तरी आपली तयारी असायला हवी. असंही यावेळी शरद पवार म्हणाले

आज देशात महागाई वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, धान्याचे दर गगनाला भिडले आहेत. वाढत्या टॅक्समुळे सामान्य माणसांवर मोठा भार निर्माण झालेला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आपण पाहत आहोत. याचे अर्थव्यवस्थेवर दुरोगामी परिणाम होऊ शकतात. असं म्हणत शरद पवारांनी देशाच्या आर्थिक स्थितीवरही बोट ठेवलं.