सुशिक्षित माणसे असं कृत्य करुच शकत नाहीत, शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी मुंबई । मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन पेटले असताना ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने झाली होती. यावेळी कळंबोली आणि कमोठा येथील मराठा समाजातील नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी आरोपींच्या पिंजर्यात उभे केलेल्यांमधे डॉक्टर, वकील नोकरदार तसेच महिला यांचा समावेश आहे. ‘अशी सुशिक्षित माणसे असं कृत्य करुच शकत नाहीत तेव्हा सदर गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची चौकशी करून गुन्हा मागे घ्यावा’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मराठा आरक्षण मागणीकरीता कळंबोली आणि कमोठा येथील वातातवरण चांगलेच तापले होते. यातून आंदोलकांनी दगडफेक करून पोलिसांच्या गाड्या जाळल्याचा प्रकार घडला होता. यानंतर पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न आणि सरकारी कामात केलेली दखल आदी आरोप लावून २० तरुणांवर गुन्हे दाखल केले होते. तरी अद्याप अनेकांची सुटका झाली असली तरी विनाकारण आरोप केले असा मराठा समाजाचा आरोप आहे. दरम्यान शरद पवार दोन दिवसांपूर्वीच कमोठा येथे आले असता गुन्हे मागे घेण्यासाठी त्यांना मराठा समाजाकडून मागणी करण्यात आली. यानंतर पवार यांनी मुख्यमंत्र्यांना २९ डिसेंबर रोजी पत्र लिहून गुन्हे मागे घेण्याची विनंती केली.

सदर गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची यादी सोबत पाठवली असून यात मराठा समाजातील डॉक्टर, वकील, इंजिनिअर यांचा सामावेश आहे. परंतु सुशिक्षित लोक असे कृत्य करणार नाहीत. तरी याची चौकशी करून निरपराध व्यक्तीना सोडून देण्यात यावे असे पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

 

इतर महत्वाचे –

इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक

रोहित पवार आगामी लोकसभेत शिवसेनेच्या आढळरावांना पुरून उरणार?

शरद पवार पुण्यातून लढवणार लोकसभा ?

Leave a Comment