युद्धामुळे शेअर बाजार 3 टक्क्यांनी घसरला; विदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरूच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गेल्या 2 दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरु असून याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात शेअर बाजारात 3 टक्क्यांहून अधिकची घसरण झाली. युद्धसदृश परिस्थितीच्या अनिश्चिततेच्या दरम्यान गेल्या आठवड्यात बाजारात कमालीची अस्थिरता दिसून आली. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर गुरुवारी सर्वात मोठी एकदिवसीय घसरण नोंदवण्यात आली. मात्र, दुसऱ्या दिवशीच बाजारात जोरदार रिकव्हरी दिसून आली.

25 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 1,974.45 अंक किंवा 3.41 टक्क्यांनी घसरून 55,858.52 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 617.9 अंकांनी म्हणजेच 3.57 टक्क्यांनी घसरून 16,658.40 वर बंद झाला.

मोठे चढ-उतार कशात झाले ?
गेल्या आठवड्यात, tata Teleservices (Maharashtra), Aegis Logistics, Urja Global, Sadbhav Infrastructure Projects, Soril Infra Resources, Olectra Greentech, Indiabulls Housing Finance, Syncom मध्ये 10-22 टक्क्यांची मोठी घसरण झाली. दुसरीकडे, Salasar Techno Engineering, Orient Bell, Garware Hi-Tech Films, Federal-Mogul Goetze आणी Vadilal Industries 10-18 टक्क्यांनी वधारले.

रुपयाही घसरला
जर आपण वेगवेगळ्या सेक्टर्सवर नजर टाकली तर, मागील आठवड्यात सर्व सेक्टर्स रेड मार्कमध्ये बंद होते. निफ्टी मीडिया इंडेक्स 7.6 टक्क्यांनी घसरला. त्याच वेळी, PSU बँक इंडेक्स 5.7 टक्क्यांनी आणि ऑटो इंडेक्स 4.6 टक्क्यांनी तुटला. गेल्या आठवड्यात, भारतीय रुपया साप्ताहिक आधारावर 63 पैशांनी घसरून 75.29 वर बंद झाला, तर 18 फेब्रुवारी रोजी डॉलरच्या तुलनेत रुपया 74.66 वर बंद झाला.

परदेशात विक्री-बंद
25 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनीही पुन्हा विक्री केली. गेल्या पाच महिन्यांपासून त्यांची विक्री या आठवड्यातही चालू राहिली, आर्थिक वर्ष 2022 मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे 2.25 लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकले. गेल्या आठवड्यात, देशांतर्गत बाजारात 19,843.52 कोटी रुपयांची विक्री झाली तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी 21,511.79 कोटी रुपयांची खरेदी केली. फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत FII ने एकूण 41,771.60 कोटी रुपयांची तर DII ने 37,941.25 कोटी रुपयांची विक्री केली आहे.

Leave a Comment