बऱ्याच जणांना मी *** घोडा : आ. शशिकांत शिंदेंची जीभ घसरली

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने शेवटचा टप्पा गाठला आहे. कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही पॅनेलमधून राजकीय आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झाडू लागल्या आहेत. अशातच माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते आ. शशिकांत शिंदे यांचा एक व्हिडिअो जोरदार व्हायरल होवू लागला आहे. त्यामध्ये त्यांची बोलताना जीभ घसरताना दिसून आली.

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भर सभेत एका एकाला घोडा लावण्याची भाषा केल्याने जनमानसात हा मोठा चर्चेचा विषय बनला आहे. याबद्दल प्रसारमाध्यमात सध्या मोठ्या प्रमाणावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून यावर माजी मंत्री व आमदार शशिकांत शिंदे चांगलेच ट्रोल होताना दिसून येत आहेत. नेटिझम्समध्ये यावर वेगवेगळ्या चर्चाना उत आला आहे. किसनवीर सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीत चांगलाच रंग चढताना दिसून येत आहे.

आ. शशिकांत शिंदे म्हणाले, मी आता आबांना सांगणार आहे, मागच्यावेळी काठी वगैरे घेवून तुम्ही अपक्ष लढला होता. तुम्ही कपबशीच्या ऐवजी घोडा चिन्ह घेतले असत, तर बरे झाल असतं. आता मतदारांनी 3 तारखेला आपली कपबशी लक्षात ठेवायची आहे. थोड्या दिवसांनी बऱ्याच जणांना मी *** घोडा…काही लोकांना आता वाटते आम्ही जिल्हा जिंकायला निघू.