शत्रुघ्न सिन्हा यांचा ‘खामोश’पणे पाकिस्तान दौरा; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध चित्रपट अभिनेते तथा लोकसभेचे माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा पुन्हा एकदा चर्चेत आहेत. शत्रुघ्न सिन्हाचा लग्नातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा व्हिडिओ पाकिस्तानातील लाहोरमधील विवाहातील आहे. पाकिस्तानशी भारताचे बिघडलेले संबंध पाहता, शत्रुघ्न सिन्हा यांनी छुप्या पद्धतीने लाहोरला जाऊन एका लग्नाला हजेरी लावली असल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तानच्या परवेझ मुगल नावाच्या छायाचित्रकाराने या लग्न सोहळ्यातील एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये फिल्मस्टार शत्रुघ्न सिन्हा लाहोरमध्ये एका लग्नात हजेरी लावताना दिसत आहेत. छायाचित्रकार परवेझ मुघल हा व्हिडिओ शेअर करताना लिहलं आहे, ‘हन्ना आणि अहमदच्या कव्वाली नाईटमध्ये रीमा आणि शत्रुू जी हॅपनिंग नाऊ!. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबाबत शत्रुघ्न सिन्हा यांनी कोणतेही विधान केलं नाही आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी व्यावसायिक असद अहसनच्या मुलाच्या लग्नात भाग घेण्यासाठी लाहोरलाशत्रुघ्न सिन्हा पोहोचले आहेत. शत्रुघ्न सिन्हा आपल्या पाकिस्तानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात इथल्या काही राजकारण्यांना भेटू शकतात. भारत आणि पाकिस्तानमधील बिघडलेले संबंध लक्षात घेता बॉलिवूड स्टार ते राजकारणी हे पाकिस्तानात जाण टाळतात. अलीकडेच सलमान खानने एका पाकिस्तानी कार्यक्रमात काम करण्यास नकार दिला आहे.

 

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment