Wednesday, October 5, 2022

Buy now

अंगावर वीज कोसळून मेंढपाळ अन् मेंढ्यांचा मृत्यू

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथील नरळे वस्ती परिसरातील माळरानावर रामचंद्र पांडुरंग गडदे हा मेंढपाळ अंगावर वीज पडून जागीच ठार झाला तर सुमारे दहा मेंढ्या मरण पावल्या. ही घटना गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

नांगोळे येथील रामचंद्र गडदे व इतर तीन चार मेंढपाळ मेंढ्या करण्यासाठी नरळे वस्ती परिसरातील माळरानावर गेले होते. पावसाचे वातावरण दिसल्याने हे चारही मेंढपाळ मेढ्या घेवून घरी परत येत होते. जत रस्त्याच्या लगत असलेल्या नरळे वस्ती परिसरातील माळरानावर आले असता विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरू झाला. याचवेळी रामचंद्र गडदे यांच्या अंगावर वीज पडून जागीच ठार झाले आहेत.

मयत गडदे यांचा भाचा सचिन हुबाले यांनी मयत अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश दोपारे यांनी पोलिस ठाण्यास माहिती दिली. पोलिस हवालदार विनोद चव्हाण व सुहास मोहिते यांनी पंचनामा केला. पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. आता पोलिस अधिक तपास करीत आहेत.