Friday, June 9, 2023

शेतकरी संघटनेनं दिलं सत्तास्थापनेबाबत अल्टिमेटम, तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

कोल्हापूर प्रतिनिधी । राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाले आहे. मुख्यमंत्री कोणाचा यांच्या खेळात शेतकऱ्याचे हाल होत आहेत. असा संताप शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी व्यक्त केला. सत्ता लवकर स्थापन करा अन्यथा शेतकरी संघटना आसूड उगारेल असा इशारा ही त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे.

विधानसभा निवडणूक होऊन १८ दिवस झाले. मात्र अद्याप सरकार स्थापन झाले नाही. भाजप म्हणतंय आमचं सरकार येणार तर दुसरीकडे महाशिवआघाडी म्हणते आमचे सरकार स्थापन होणार. मात्र यांच्या खेळात शेतकरी मरत आहे. शेतकऱ्यांना त्वरित मदत नाही मिळाली तर आम्हाला आसूड हातात घ्यावा लागेल असा इशारा रघुनाथ पाटील यांनी दिला.