शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्राच्या कंपनीचा दिला राजीनामा, आता पोलिस अधिक तपासात गुंतले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा हे सध्या खूप चर्चेत आहेत. पॉर्न व्हिडिओ बनविणे आणि मोबाईल अ‍ॅप्सद्वारे सोडणे अशा गंभीर आरोपाखाली या अभिनेत्रीच्या नवऱ्याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. जेव्हापासून गुन्हे शाखेने राज कुंद्राला अटक केली आहे, तेव्हापासूनच दररोज या प्रकरणाशी संबंधित नवंनवीन खुलासे होत आहेत. शिल्पा शेट्टी पूर्वी राज कुंद्राच्या कंपनी वियान इंडस्ट्रीजमध्ये मोठ्या पदावर असल्याचा संशय आता मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने व्यक्त केला आहे. पण, नंतर तिने कंपनीतून राजीनामा दिला.

मुंबई सायबर सेलने सन 2020 मध्ये 7 OTT प्लॅटफॉर्मना नोटीस बजावल्यानंतर शिल्पा शेट्टीने राज कुंद्राच्या या कंपनीचा राजीनामा दिला होता. अलीकडच्या काळात राज कुंद्राची कंपनी कोणीकोणी सोडली आहे याविषयीही गुन्हे शाखा चौकशी करत आहे. शिल्पा शेट्टी ही राज कुंद्राच्या JL Stream App कंपनीची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असल्याचेही मुंबई क्राइम ब्रँचच्या तपासणीत उघडकीस आले आहे.

गुन्हे शाखेची टीमही या कंपनीचा शोध घेत आहे. पॉर्न रॅकेट प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्रा यांच्या कंपनी वियानचे संचालक आणि इतर कर्मचाऱ्यांना समन्स बजावले आहे. समन्स पाठवून कंपनीच्या आयटी आणि फायनान्स विभागाचे संचालक आणि कर्मचार्‍यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. आज या सर्वांकडून गुन्हे शाखा कार्यालयात चौकशी केली जाऊ शकते.

नुकतीच क्राइम ब्रांचची टीमही राजच्या संदर्भात त्याच्या घरी गेली. जेथे राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची समोरासमोर बसून चौकशी केली गेली. दुसरीकडे शिल्पा शेट्टीदेखील वियान इंडस्ट्रीजमध्ये राजीनामा दिल्यामुळे गुन्हे शाखेच्या संशयाखाली आहेत. याशिवाय राज कुंद्राच्या खात्यातून सट्टेबाजी कंपनीकडे मोठ्या प्रमाणात रक्कम ट्रांसफर केल्याचीही चर्चा आहे.

Leave a Comment