शिरवळ पोलिसांची कारवाई : कोयत्याचा धाक दाखवून मुलीचे अपहरण करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खंडाळा | शिरवळ येथे कोयत्याचा धाक दाखवत मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या आंतर जिल्हा सराईत टोळीला जेरबंद करण्यात शिरवळ पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील सर्व संशयित एक महिन्यापासून फरार होते. संशयित तिघांकडून आठ गुन्हे उघड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी मनोज संदीपान शिंदे (वय- 42, रा. बोराटवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे), अजय संजय आढाव (वय- 21), सचिन प्रकाश जाधव (वय- 28, दोघेही, रा. मेडद, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. या गुन्ह्यातील मुख्य संशयिताने पीडित मुलीला पळवून नेण्यासाठी आपल्या साथीदारांसमवेत येऊन पीडितेला तिच्या घरात शिरून घरातील लोकांना कोयत्याचा धाक दाखवून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता.

शिरवळ पोलिसांच्या पथकाने त्यांचा शोध घेऊन अटक केली आहे. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्याच्या तपासात शिरवळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नवनाथ मदने, सहायक पोलिस निरीक्षक, राजकुमार भुजबळ, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित, महिला पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सहायक फौजदार पांडुरंग हजारे, जितेंद्र शिंदे, अमोल जगदाळे, स्वप्नील दौंड, शिवराज जाधव यांनी सहभाग घेतला. याप्रकरणी शिरवळ पोलिसांचे जिल्हा पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Comment