शिवसेनेला अजून एक धक्का ! ‘या’ माजी खासदाराने दिला नेतेपदाचा राजीनामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) हे आता बंडखोर शिंदे गटाच्या मार्गावर आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. अडसूळ (Anandrao Adsul) यांनी आपल्या नेतेपदाच्या राजीनाम्याचे पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे पाठवले आहे. या पत्रामध्ये त्यांनी अडचणीच्या काळात पक्ष आणि नेतृत्व पाठिशी न राहिल्याची भावना व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी ईडीने केलेल्या कारवाईवेळी पक्ष नेतृत्वाकडून आजारपणात साधी विचारपूसही न केल्याची खंत व्यक्त केली. विशेष म्हणजे आनंराव अडसूळ (Anandrao Adsul) यांचे पुत्र अभिजीत अडसूळ एकनाथ शिंदे गटात आधीपासूनच आहेत. त्यामुळे आता आनंदराव देखील त्यांच्यासोबत जावून मिळणार असल्याची चर्चा आहे. जर असे झाले तर शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जाईल.

अमरावतीच्या सिटी बँकेत अनियमितता झाल्याच्या आरोपावरून ईडीने शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या घरी धाड टाकली होती. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याची दाट शक्यता होती. मात्र, अचानक प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तरीही ईडीचे अधिकारी तब्बल 14 तास रुग्णालयात तळ ठोकून होते. यानंतर ईडीचे अधिकारी तेथून निघून गेले. विशेष म्हणजे ईडीने अडसूळ (Anandrao Adsul) यांना चौकशीसाठी अनेकदा समन्स बजावले होते. पण ते चौकशीसाठी हजर राहू शकले नव्हते.

आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शिवसेनेच्या नेतृत्वाकडून अडचणींच्या काळात साधा फोन करुन विचारपूसही करण्यात आली नाही यामुळे आनंदरावर अडसूळ नाराज होते. त्यातूनच त्यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या नेतेपदाच्या राजीनाम्याचे पत्र पाठवले आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. आनंदराव अडसूळ जर शिंदे गटाला जाऊन मिळाले तर हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जाईल.

हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान

आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा धक्का, ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानला झाला फायदा

खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे

नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार

Leave a Comment