पाणी प्रश्नावर आता शिवसेनाही आक्रमक; चंद्रकांत खैरे यांनी आयुक्तांची घेतली भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : शहरात पाणी प्रश्न मोठा चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करा, शहरातील प्रलंबित रस्त्यांची कामे जलदगतीने करा, विविध नागरी समस्या जलदगतीने सोडवा अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. या मागण्याचे निवेदन देत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मनपा आयक्त तथा प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांची भेट घेतली.

शहरात अनेक भागात रस्त्याची कामे अपूर्ण आहेत. यामध्ये प्रामुख्याने आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक, रोपळेकर हॉस्पिटल, जवाहर कॉलनी, गारखेडा, सिडको-हडको, जुने शहर, सातारा परिसर, मयूर पार्क भागात रस्ते खराब झाले असून याबाबत लक्ष देण्याची मागणी केली. या शिष्टमंडळात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, सहसंपर्कप्रमुख त्रिम्बक तुपे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, गटनेते मकरंद कुलकर्णी, माजी नगरसेवक अनिल जैस्वाल, किशोर नागरे आदींची उपस्थिती होती.

आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या आधी देखील भाजपच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांची भेट घेत याच मागण्या केल्या होत्या. शहरातील पाणी प्रश्न गंभीर होत असून नागरिकांमध्ये पाणीपुरवठ्यावरुन नाराजी पसरली आहे. त्यामुळे हा रोष आपल्यावर नको, या दृष्टिकोनातून ही भेट असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment