आता तुम्ही तरी नाच्याचे काम चांगले करा आणि नाव कमवा; राणेंच्या टीकेला जाधवांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनात शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केलेल्या नक्कलीवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जाधव यांच्यावर टीका केला आहे. राणेंचा टीकेला जाधव यांनी उत्तर दिले आहे. “तुम्ही संसदेत दिलेले उत्तर संपूर्ण देशाने पाहिले आहे, आता नाच्याचे काम तर चांगले करा आणि नाव कमवा, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी राणेंवर पलटवार केला आहे.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते भास्क जाधव यांच्यावर झरी टीका केली. त्याच्या टीकेला तितक्याच परखडतेने जाधव यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. इणेंच्या टीकेनंतर आमदार भास्कर जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, माझ्या नक्कलीबद्दल बोलणाऱ्या राणेंनी जरा चांगली नक्कल करावी. तुम्ही संसदेत दिलेले उत्तर संपूर्ण देशाने पाहिले आहे, आता नाच्याचे काम तर चांगले करा आणि नाव कमवा.

भारतीय जनता पार्टीचे लोक इतरांना सौजन्याने वागण्याचे सल्ले देतात, मात्र त्यांच्या पार्टीचे लोक तालिका अध्यक्षांवर काहीही बोलतात, तेव्हा कुठे गेला होता तुमचा राधासुता धर्म?. आपला मुलगा नितेश राणे चुकीचे वागत असतानाही मुलाच्या पाठिशी उभे राहत पाठराखण करन्यायाचे काम करत असल्याचे टीका जाधव यांनी नारायण राणे यांच्यावर केली.