व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे मणिपूरमध्ये

औरंगाबाद – औरंगाबादेतील नेत्यांना शिवसेनेचा सर्वात मोठा नेता मीच आहे, बाकीच्यांशी माझी तुलनाच होऊ शकत नाही, असे ठणकावून सांगणाऱ्या चंद्रकांत खैरे यांच्यावर शिवसेनेने मोठी जबाबदारी टाकलेली दिसून येत आहे. औरंगाबादचे शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे सध्या मणिपूरमध्ये शिवसेनेच्या प्रचारासाठी दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे अन्य काही पदाधिकारी आणि शिवसैनिकदेखील आहेत.

मणिपूर विधानसभेच्या प्रचार दौऱ्यासाठी 13 फेब्रुवारी रोजी चंद्रकांत खैरे दाखल झाले असून पुढील चार दिवस ते तेथील उमेदवारांचा प्रचार करतील. मणिपूर विधानसभेच्या 60 जागांसाठी निवडणूक असून या ठिकाणी शिवसेनेने पाच जागांवर उमेदवार उभा केला आहे. यंदा उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्येही निवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असून या चारही ठिकाणच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी शिवसेनेने मातब्बर नेत्यांची फौज लावली आहे.

उमेदवारांच्या प्रचारासाठी युवासेनेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासह दिग्गज नेते मैदानात उतरवले आहते. मणिपूर राज्यात शिवसेना उमेदाराच्या प्रचाराची जबाबदारी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यासाठी औरंगाबादचे नेते थेट मणिपूरमध्ये दाखल झाले असून पुढील काही दिवस त्यांचा मुक्काम मणिपूरमध्ये असेल.