Monday, January 30, 2023

राणेंनी प्रहारची भाषा करू नये, आम्हीच त्यांच्यावर प्रहार करत आलोय; उदय सामंतांची घणाघाती टीका

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या प्रहार या मुखपत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद हडपण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली. आता तुमच्याकडे आहे ते फक्त सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्रिपद, असे राणेंनी म्हंटले होते. त्यांना शिवसेना नेते तथा उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “नारायण राणेंनी प्रहारची भाषा करू नये, आम्हीच त्यांच्यावर प्रहार करत आलो आहे, अशी टीका सामंत यांनी केली आहे.

मंत्री नारायण राणे यांनी अग्रलेखातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर दोन दिवसांपूर्वी टीकेची तोफ डागली होती. त्याचा मंत्री उदय सामंत यांनी यावेळी समाचार घेतला. सामंत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शिवसेना सोडलेल्या मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार सोडण्याची भाषा करू नये. कारण आम्हीच त्यांच्यावर अनेकवेळा प्रहार करत आलो आहे. म्हणूनच मी कोकणातून चारवेळा निवडूनही आलो आहे.

- Advertisement -

मंत्री नारायण राणे यांच्याकडून अनेकवेळा उख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर टीका केली जाते. त्यांनी नुकतीच प्रहार या त्यांच्या मुखपत्रातून मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला होता. तसेच शिवसेना, हिंदुत्वाचा मुद्दाही उपस्थित केला होता. त्यांच्या या मुद्द्यांवरून आज शिवसेना नेते उदय सामंत यांनी राणेंवर टीका केली आहे.