पक्षात आपली बदनामी करण्याचे षडयंत्र; रामदास कदमांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. या मेळाव्यास शिवसेनेचे नेते, उपनेते, मंत्री, आमदार, महापौर आणि नगरसेवक उपस्थित राहणार असून शिवसेना नेते रामदास कदम हे उपस्स्थत राहणार का? असा सवाल केला जात असताना कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. त्यात कथित ध्वनिफितींबाबत बाजू मांडली असून पक्षात आपली बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे म्हंटले आहे.

शिवसेना नेते तथा माजी मंत्री रामदास कदम यांनी आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. त्यांनी पत्रात म्हंटले आहे की, आपण दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नाही. गेल्या तीन महिन्यापासून आपण आजारी असून इन्फेक्शनची लागण होऊ नये यासाठी डॉक्टरांनी त्यांना गर्दीत न जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे प्रकृती अस्वास्थ्यामुळे दसरा मेळाव्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या शिवसेना पक्षात आपली बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. आठवडाभरात व्यक्तिशः भेटून आपल्या भावना व्यक्त करणार आहे. सध्या आपल्या विरोधात आपल्याच पक्षातील काहींकडून बदनामी करण्याचे काम केले जात आहे. त्याबाबत लवकरच भेट घेऊन सविस्तर चरचा करणार आहे. अशात आपली तब्बेत बिघडली असल्याने त्यामुळे आपल्याला या दसरा मेळाव्याला उपस्थित राहता येणार नाही.

Leave a Comment