शिवसेना कायदेशीर लढाईत कुठेही कमी पडणार नाही पण…; संजय राऊतांचे सूचक विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये आपला विजय होईल असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन्ही गटांनी केला आहे. या दरम्यान आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे तसेच एक सूचक असे विधानही केले आहे. “कादेशीर लढाईत सेना कुठेही कमी पडणार नाही. पण आम्हाला माहीत आहे, कोणावर कसा दबाव आणला जातो ते. कायद्याची पायमल्ली सुरू आहे. लोकशाहीचा खून करण्याचा मिनिटा मिनिटाला प्रयत्न होत आहे,”अशी टीकाही राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या 11 जुलैला निकाल आहे. उद्याच्या निर्णयाकडे आमच्यासह सर्वांचेच लक्ष लागले आहे. लोकशाही आणि न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे की नाही हे उद्याच सर्वांना कळेल. आमची न्यायव्यवस्था किती दबावात आहे. हे उद्या स्पष्ट होईल.

आम्हाला जर कुणी विचारले की, आम्ही कुणासोबत आहोत तर त्याला एकच उत्तर आम्ही देऊ ते म्हणजे आम्ही मातोश्रीच्यासोबत आहोत. मातोश्री आमची आई आहे. शिवसेना जामची आई आहे. आम्ही आईसोबत गद्दारी करत नाही. बेईमानी करत नाही. लाखो शिवसैनिक आणि मातोश्रीचे नाते अतूट आहे. मातोश्रीवर सध्या रोज 15-15 तास बैठका होत आहेत. प्रत्येक शहरातील शिवसैनिक भेटायला येत आहे. त्यामुळे लक्षात ठेवावे ही ठाकरेची शिवसेना आहे, असा इशाराही राऊत यांनी शेवटी बोलताना बंडखोर आमदारांना दिला आहे.

Leave a Comment