Tuesday, January 31, 2023

महाराष्ट्रामध्ये छापेमारी सुरू, अपना टाईम भी आयेगा; संजय राऊतांचा भाजपला इशारा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात विविध ठिकाणी सध्या राजकीय नेत्यांच्या संस्था, सहकारी कारखाने, नातेवाईकांची कार्यालये या ठिकाणी आयकर विभागाच्यावतीने छापे टाकले जात आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत इशारा दिला आहे. “ज्याप्रकारे महाराष्ट्रामध्ये छापेमारी सुरू आहे, हे सुडाचे राजकारण आहे. हेही दिवस निघून जातील, दिल्लीत आमचेही दिवस येतील, अपना टाईम भी आयेगा, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात शिवसेनाचा कोणत्याही परिस्थिती दसरा मेळावा होणार आहे. सध्या जी काही चापरमारी सुरु आहे. त्याबाबत सांगायचे झाले तर आमचे हेही दिवस निघून जातील, दिल्लीत आमचेही दिवस येतील, अपना टाईम भी आयेगा, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे, असा इशारा राऊतांनी दिला आहे.

- Advertisement -

तसेच राऊत पुढे म्हणाले की, राज्यात सध्या विरोधकांकडून सोशल मीडियाचा वापर द्वेषाचा आणि सुडाचे राजकारण करण्यासाठी केला जातो. आपल्या राजकीय विरोधकांची बदनामी करण्यासाठी केला जात असल्याची टीकाही यावेळी राऊत यांनी केली आहे.