हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत नुकतेच विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेक मुद्यांनी एकमेकांवर टोलेबाजी केली गेली. या टोलेबाजीचा आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. ‘नुकतेच अधिवेशन झाले. अत्यंत चांगल्या पद्धतीने हे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चांगल्या रीतीने पार पाडली. यावेळी टोले देत टोले घेत आणि दोन देत चार घेत हेही अधिवेशन पार पडले,’ असा टोला राऊत भाजपला लगावला.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राजकारणात पैशांना फार महत्व आहे. अनेक लोक आपले पैसे अथवा दागदागिने घरी ठेवतात. मात्र, दुसऱ्याच्या घरी मिळाली की चर्चा होती. लखनऊ, कनोज येथे 180 कोटींचे अत्तर मिळाले आहे. या अत्तरावरून राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. या अत्तराचा उपयोग करुन भाजप निवडणूक लढवणार आहे काय? राजकारणामध्ये हमाम मे सब नंगे है. उत्तर प्रदेशच्या 71 व्यापाऱ्यांकडे 180 कोटी रुपयांचे घबाड सापडल्याने देशात प्रत्येकाला अत्तर विकावेसे वाटत आहे. कुणी किती काही म्हंटले तरी त्या अत्तराशिवाय राजकारण करु शकत नाही. जितकी आपण जास्त चर्चा करु तितका त्याचा गंध पसरेल,असेही यावेळी राऊतांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती स्थिर आहे. मुंबईत पार पडलेले विधानसभेचे हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सुरळीत पार पडले, असेही यावेळी राऊत यांनी सांगितले.