काही नेते गांजा मारून वक्तव्य करतात, त्यांचीही नार्को टेस्ट करायला पाहिजे; संजय राऊतांची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकार वर भाजपकडून टीकास्त्र डागली जात आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर भाजप जास्तच आक्रमक झालेला आहे. भाजपकडून केल्या गेलेल्या टीकेबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. ” काही नेते सध्या गांजा मारून वक्तव्ये करीत आहेत. त्यांच्याकडून केल्या जात असलेल्या वक्तव्याबद्दल त्यांचीही ईडी, एनसीबीकडून नार्को टेस्ट व्हायला पाहिजे, असे राऊत यांनी म्हंटले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “महाराष्ट्रात व देशात एक नवीन प्रकारची प्रथा निर्माण झाली आहे कि ती म्हणजे माहाराष्ट्रात व देशात गांजाचे पीक जास्त प्रमाणात निर्माण झाले आहे. काही लोक गांजा मारून काम करत आहेत. दसरा मेळाव्यानंआतर वारंवार दिसत आहे कि विरोधीपक्ष बेतालपणे बोलतोय. या सर्वांची आता नार्को टेस्ट केली पाहिजे. एनसीबीनेही त्यांची तपासणी करून पाहिले पाहिजे.

आम्ही २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रीय स्थरावर आम्ही असणार आहे. लोकसभा निवडणूक आम्ही सर्व ताकदीने लढणार आहे. आम्ही राष्ट्रीय स्तरावर वेगळ्या भूमिकेवर असू. आमच्या मागे जो काही ईडी व एनसीबीचा ससेमिरा लावला. त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, हि जी काय तुमची हत्यारे आहेत. ती तुम्हीचालवत आहात. ती २०२४ मध्ये तुमच्यावरही उलटू शकतात. लोकशाही हि खूप चंचल आहे. आणि बहुमत हे त्यापेक्षाही चंचल असते, असे राऊत यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment