गोव्यात युती झाली तर ठीक नाही तर….; संजय राऊतांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोव्यात शिवसेनेकडून निवडणूक लढविण्याची तयारी केली जात आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊतांनी गोव्यातील भाजप सरकारवर टीका केली.” लोकप्रतिनिधींना फोडून भाजपने गोव्यात सत्तेचा खो खो सुरू केला आहे. जनतेला थापा मारून त्यांची फसवणूक केली जात आहे,अशी टीका करीत या ठिकाणी युती झाली तर ठीक नाहीतर आमचं आम्ही लढू असा इशारा राऊतांनी दिला आहे.

गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षांकडून मोर्चे बांधणी केली जात आहे. अशात गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते लुईझिन्हो फालेरो यांनी गोव्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षातून आपला राजीनामा दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी निवडणूक लढविण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरु केले आहेत. दरम्यान आज शिवसेना खासदार संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद सोडताना गोव्यातील भाजप सरकारवर टीकास्त्र डागले.

यावेळी राऊत म्हणाले की, “गोव्याच्या जनतेची भाजप सरकारने फसवणूक सुरू केली आहे. जे निवडून आले आहेत ते पक्ष बदल करत आहेत आणि ज्या पक्षात जात आहेत त्यांना लाज नाही. गोव्यात पक्ष फोडले जातात असून भाजपकडून सत्ता हस्तगत केली जाते. गोव्यात आप, तृणमूल सारखे पक्ष निवडणूक लढवणार आहेत. शिवसेनेची गोव्यात ताकत आहे. आम्ही 22 जागा लढवणार आहोत. कॅसिनोच्या विरुद्ध प्रचार करून सत्तेवर आलेले भाजप आता त्याचे समर्थन करत आहेत, अशी टीकाही यावेळी राऊतांनी केली.

Leave a Comment