अमरावतीमध्ये आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांचा हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांनी हल्लाबोल केला आहे. या घटनेमुळे अमरावती शहरात मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी शिवसैनिकांनी बांगर (Santosh Bangar) यांची गाडी अडवत 50 खोक्के एकदम ओक्के अशी घोषणाबाजीदेखील केली.

काय घडले नेमके?
आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) आज अंजनगांव सुर्जी येथील मठातून दर्शन करुन निघाले असता शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर हल्लाबोल करित पन्नास खोके एकदम ओकेचे नारे दिल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. संतोष बांगर आज दुपारी 3 वाजता अंजनगांव सुर्जी येथील देवनाथ मठात दर्शनाकरीता आल्याची कुणकूण तालुक्यातील शिवसैनीकांना लागली आणि शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनिक लाला चौकात गोळा झाले.

यानंतर सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास आमदार बांगर (Santosh Bangar) यांच्या वाहनाचा ताफा मठाबाहेर पडताच शिवसैनिकांनी पन्नास खोके एकदम ओकेचे नारे देत त्यांच्या गाडीवर हातांनी बुक्या मारत जोरदार हल्ला केला. या सगळ्या प्रकारामुळे लाला चौकात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
वेदांतानंतर आता फोन पे महाराष्ट्रातून बाहेर पडणार
आकाशात विमान झेपावताच विमानातून उडाल्या ठिणग्या, Video आला समोर
टेलिकॉम कंपन्यांच्या ‘या’ सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्सविषयी जाणून घ्या
RBI कडून आणखी एका सहकारी बँकेचे लायसन्स रद्द !!!
‘या’ 2 बँकांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठीची एफडी योजना 1 ऑक्टोबरपासून बंद होणार