नववारी साडी घालून 74 किलोमीटर घेतली धाव ; शिवरायांच्या हिरकणीच्या नावे अनोखा विश्वविक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | किल्ले राजगड ते किल्ले अजिंक्यतारा असा तब्बल १११ किलोमीटर ते हि नववारी साडी घालून आणि  शिवज्योत घेऊन धावत पूर्ण करण्याचा विक्रम साताऱ्यातील एका महिला हिरकणीने केला आहे . यात विशेष म्हणजे नववारी साडी घालून तब्बल 12 तासात 74 किलोमीटर धावून डॉ . शुभांगी गायकवाड यांनी एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपले नाव नोंदवले आहे .

साताऱ्यातील हिरकणी ग्रुपच्या सदस्य असलेल्या डॉ.शुभांगी गायकवाड यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने हा उपक्रम हाती घेऊन तो पूर्ण देखील केला आहे . त्यासाठी त्यांनी गेल्या ३ महिन्यापासून तयारी केली होती . नववारी साडीत एवढे धावणे शक्य नसल्याने त्यांनी याची तयारी केली आणि काल १८ तारखेला राजगडावरून धावायला सुरुवात केली .

नववारी साडी घालून 12 तासांत 74 किमीची घेतली धाव; शिवरायांच्या हिरकणीच्या नावे अनोखा विश्वविक्रम

त्याचा या खडतर प्रवासात त्यांना त्याचा हिरकणी ग्रुपच्या सदस्यांनी मदत केली आहे .  काही महिला सदस्यांनी त्याचा सोबत धावून त्यांना प्रोत्साहन देखील दिले आहे. तर ठिकठिकाणी त्याचे स्वागत देखील केले जात आहे .

महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नसून महिलांचं सबलीकरण व्हावं यासाठी ही विक्रमी धाव घेतली आहे असं मत यावेळी डॉ.शुभांगी गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. सर्व महिलांनी घराच्या बाहेर पडून काहीतरी केलं पाहिजे अस आवाहन त्यांनी महिलांना केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment