शिवभोजन सेंटर सुरु कारण ते शिवसेना कार्यकर्ते चालवता : निलेश राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाचा विळखा कमी करण्यासाठी 15 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात संचारबंदी आदेशासह कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लॉकडाऊनची घोषणा करताना मुख्यमंत्री हातावर पोट असणाऱ्यांसाठी एक आर्थिक पॅकेजही जाहीर केल आहे. हे पॅकेज म्हणजे शिवभोजन थाळी मोफत दिली जाणार. या वरूनच आता माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे यांनीही ठाकरे सरकारला टोला लगावला.

15 दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात शिवभोजन केंद्र सुरु राहणार आहेत. शिवभोजन थाळी मोफत दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीय. यावरुन निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. “शिवभोजन सेंटर उघडी राहणार कारण शिवसेनेचे कार्यकर्ते सेंटर चालवतात, पण इतरांचे रेस्टॉरंट बंद राहणार. घराबाहेर जाऊन पार्सल घ्या, कोरोना होणार नाही. रिक्षा टॅक्सी फिरू द्या पण तुम्ही फिरू नका. मुंबईच्या बिल्डरांना मदत करताना हजार कोटी पण गरिबांना मदत करताना पाचशे-हजार”, असं ट्वीट करत निलेश राणे यांनी राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयावर टीका केली आहे.

 

त्याचबरोबर राज्यातील गरीब वर्गाला महिनाभरासाठी प्रतिव्यक्ती 3 किलो गहू आणि 2 किलो तांदुळ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीय. काल ही घोषणा केल्यानंतर आज अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे भुजबळांनी केंद्राकडे मदतीची मागणी केली आहे. त्यावरुनही निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलंय.

You might also like