‘म्याव म्याव’ करणाऱ्या नितेश राणेंना निलंबित करा; सभागृहात शिवसेना आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेच्या पायरीवरून शिवसेना आमदार आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली होती. यावरून शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी आक्रमक होत नितेश राणे याना निलंबित करावे अशी मागणी सभागृहात केली आहे. त्यांनतर शिवसेनेने नितेश राणेंविरुद्ध घोषणाबाजी देत आवाज उठवला.

बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत आणि त्यांच्या वंशजाबद्दल कोणी काही बोलत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही . बाळासाहेब वाघ होते आणि त्यांचे वंशज वाघच होते , वाघाच्या पोटी शेळी जन्माला आली असे कधी झालं नाही , त्यामुळे आदित्य ठाकरे हे वाघच आहेत असे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी म्हंटल

विरोधकांनी विरोध करावा पण तो बौद्धिक आणि वैचारिक असावा ज्यामध्ये राज्याचे हिट असेल. कोणीही उठायचं आणि काहीही बोलायचं हे चालणार नाही. भास्कर जाधाव यांनी मोदींवर विधान केल्यानंतर माफीही मागितली. भाजपाला जसे मोदी आदरणीय आहेत तसेच आम्हीही आदित्य ठाकरे यांचा आदर करतो असं म्हणत नितेश राणे यांनी तात्काळ आदित्य ठाकरेंची माफी मागणी अन्यथा त्यांचं निलंबन करण्यात यावे अशी मागणी सुहास कांदे यांनी केली