व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शशिकांत शिंदे आणि मी एकच ; शिवेंद्रसिंहराजेंच्या विधानाने चर्चेला उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिंदे साहेब तुम्ही आणि मी एकच आहोत हे बाहेरच्यांना माहित नाही. त्यामुळे कोणी कुठेही गेले तरी आपल्या तिघांनाही कळत असतं” असं सूचक वक्तव्य सातारा-जावळीचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosle) यांनी केलं. त्यामुळे शिवेंद्रराजे पुन्हा एकदा राष्ट्रवादीत प्रवेश करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

जावळी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला सातारा-जावळीचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे, भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित राहणार होते. पण शिवेंद्रराजे वगळता इतरांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

काही दिवसांपूर्वी जावळीतीलच एका कार्यक्रमात शिवेंद्रसिंहराजेंनी शशिकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. पण त्यावर शशिकांत शिंदे यांनी मी सर्व पक्षवाढीसाठी करत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आज अचानक शिवेंद्रराजे यांनी आपण दोघे एकच आहोत, असे सूचक वक्तव्य करुन राजकीय धुरळा उडवून दिला आहे.

दरम्यान भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीत आले तर ते नगरपालिका निवडणुकीचे नेतृत्व करतील, अशी ऑफर शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसलेंना दिली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’