Tuesday, February 7, 2023

सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंक सक्षम; ईडीने नोटीस पाठवली नसून माहिती मागवलीय; शिवेंद्रसिहराजे भोसले

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे असणाऱ्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर 1 जुलै रोजी जप्तीची कारवाई करण्यासंदर्भात ईडीने नोटीस बजावली आहे. या नोटिसी संदर्भात बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी रविवारी महत्वाची माहिती दिली. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने जो जरंडेश्वर कारखान्याला जो कर्जपुरवठा केला आहे. तो एकदम सुरक्षित आहे. रिझर्व्ह बँक नाबार्ड यांच्या नियमानुसारच कर्ज पुरवठा केला असून ईडीने कोणतीही नोटीस पाठवली नसून बँकेने जो कारखान्याला कर्ज पुरवठा केला असेल तर त्याची माहिती द्यावी, अशी मागणी ईडीने केली असल्याचे भोसले यांनी यावेळी सांगितले आहे.

- Advertisement -

शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी सातारा येथे आज पत्रकार परिषद घेत बॅंकेने कारखान्याला केलेल्या कर्जपुरवठ्याबाबत ईडीने बँकेस आलेल्या पत्राविषयी माहिती दिली. यावेळी ते म्हणाले कि, चिमणगाव येथे असणाऱ्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यासह इतर काही कारखान्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने कर्ज पुरवठा केला आहे. केलेला कर्जपुरवठा हा पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सल्ल्यानुसार केला आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने बँकेच्या धोरणांप्रमाणेच हा कर्जपुरवठा केला असून हि बँक अतिशय सक्षम आहे.

सातारा जिल्ह्यातील कारखान्यांना केलेला कर्जपुरवठा व बँकेत असलेल्या ठेवींबाबत आमदार भोसले यांनी महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले कि, सभासदांच्या बँकेतील ठेवी या पूर्णपणे सुरक्षित आहेत. बँक अजूनही सक्षम आहे. तसेच बँकेने जे काही नियम, धोरणे घालून दिलेली आहेत. त्याचे बँक नियमानुसार पालन करीत आलेली आहे, असेही शेवटी भोसले यांनी सांगितले.