शिवेंद्रराजे मतदारसंघातील नागरिकांसाठी तत्पर, झोपडपट्टीतील गरजूंना केले अन्नधान्याचे वाटप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनीधी |  कोरोना व्हायरस महामारीने जगामध्ये हाहाःकार उडवला असताना देशात कोरोनाच्या पार्शवभुमीवर लाॅकडाऊन सुरु आहे. कित्येक नेत्यानी स्व:ताला क्वारटाईन करुन घेतल असताना जावलीचे आमदार शिवेद्रराजे भोसले मतदार संघातील नागरिकांना मदत करताना दिसत आहेत. लाॅकडाउनमुळे तळहातावर पोट असणार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशात भाजपच्या स्थापनादिनानिमित्त भोसले यांनी गरिबांना अन्नवाटप केले.

लॉक डाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. गोर गरीब आणि रोजंदारी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीत आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गोर- गरिबांसाठी धावून आले असून येथील नामदेववाडी झोपडपट्टीतील शेकडो कुटुंबाना त्यांनी अन्नधान्य दिले. त्यामुळे या गरजू लोकांचा पुढील पंधरा दिवसांचा पोटापाण्याचा प्रश्न मिटला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असल्याने जगायचं कसे असा यक्ष प्रश्न निर्माण झालेल्या या लोकांना आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.   

कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता देशभरात इतर सर्व दुकाने बंद आहेत. लॉक डाऊनमुळे इतर सर्व दुकाने बंद असल्याने रोजंदारी करणाऱ्या, हातावर पोट असणाऱ्या आणि गोर- गरीब लोकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा लोकांना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मदतीचा हात दिला आहे. सोमवारी भारतीय जनता पार्टीचा वर्धापनदिन होता. याचे औचित्य साधून आ. शिवेंद्रसिंहराजे एका टेम्पोमधून एका कुटुंबाला किमान पंधरा दिवस पुरतील अशी गहू, तांदूळ, साखर आणि  तेल अशी शेकडो पॅकेट्स घेऊन नामदेववाडी झोपडपट्टी येथे गेले.

त्यांच्यासमवेत माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण, मिलिंद घाडगे, रणवीर चव्हाण, दादा सपकाळ, संतोष क्षीरसागर, सतीश सूर्यवंशी, दानंजय जाधव, युवराज जाधव , मंगेश पाटील, दत्ता निपाणे, सुहास वहाळकर आदी उपस्थित होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जीवनावश्यक वस्तू स्वखर्चातून भेट देऊन या लोकांच्या पोटाला खऱ्या अर्थाने आधार देण्याचे काम केले आहे. प्रत्येक कुटुंबाला किमान पंधरा दिवस पुरेल एवढे अन्नधान्य झोपडपट्टीतील गरजू नागरिकांपर्यंत पोहचवण्यात आले. यावेळी कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी सर्वांनी मास्क परिधान केले होते तसेच सोशल डिस्टंसिंगचेही काटेकोरपणे पालन करण्यात आले. कोणीही घराबाहेर पडू नये. स्वतःचे आणि कुटुंबियांचे कोरोनापासून संरक्षण करावे. आणखी मदत लागल्यास मला कळवा, तातडीने मदत पोहोचवली जाईल, असे आश्वासन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी गरजू लोकांना केले.

Leave a Comment