शिवतांडव मित्र मंडळच्यावतीनं उदतपूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद प्रतिनिधी । जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील उदतपूर येथील शिव तांडव मित्र मंडळ दरवर्षी शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करते. शिवाजी महाराजांच्या कार्याचा वारसा जपणाऱ्या या मंडळाने याही वर्षी शिवजयंतीचा उत्सव विविध कार्यक्रम आयोजित करत दिमाखात पार पाडला. शिवजयंतीच्या दिवशी मंडळाच्यावतीने शिवाजी महाराजांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत गावातील मुला-मुलींनी मोठ्या संख्येने सहभागी होत लेझीम-टिपऱ्या खेळून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली.

WhatsApp Image 2020-02-23 at 2.02.58 PM (1)

मंडळातर्फे आयोजित केलेल्या चार दिवसांच्या या उत्सवा अंतर्गत ‘मी रमाई बोलते’ हे एकपात्री नाटकाचे सादरीकरण झाले. तर दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांच्या कार्याची महती सांगणारे व्याख्यान झाले. त्याचप्रमाणे महाराजांच्या मिरवणूक वेळीउत्सवाच्या तिसऱ्या दिवशी भक्तिमय वातावरणात कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तर चौथ्या दिवशी प्रसिद्द व्याख्यात्या आकांक्षा नवले पाटील यांचे व्याख्यान झाले. तर चौथ्या दिवशी कालिदास बिरादार यांनी उत्सवात सामील मंडंळींच्या उपस्थितीत व्याख्यान दिले.

WhatsApp Image 2020-02-23 at 2.02.58 PM

 

 

या उत्सवादरम्यान, मंडळाच्यावतीने उल्लेखनीय कर्तृत्व गाजवणाऱ्या पंचक्रोशीतील कार्यरत असणाऱ्या विविध क्षेत्रातील लोकांचा सत्कार केला गेला. रक्तदान शिबिर स्पर्धा परीक्षा व आरोग्यदायी शिबिर असे समाज उपयोगी उपक्रम राबवत शिव तांडव मित्र मंडळाने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

WhatsApp Image 2020-02-23 at 2.02.59 PM (1)

हा शिवोउत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी शिवतांडव कार्यकारी मंडळाचे सदस्य ओमकार पवार, वैभव पवार, स्वप्निल पवार, हनुमंत पवार तसेच गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

WhatsApp Image 2020-02-23 at 2.02.59 PM

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment