…तरच युती करू, अन्यथा स्वबळावर लढणार ; भाजपला अजुन एका मित्रपक्षाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेने सोबतची 25 वर्षांची युती तुटल्यानंतर भारतीय जनता पक्षाला अजून एक धक्का बसण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात भाजप सोबत छोटे छोटे पक्ष सोबतीला असले तरी महाविकास आघाडीचा वारू रोखणे वाटत तेवढं सोप्प नाही. त्यातच आता शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनीही भाजपाला इशारा दिला आहे. भाजपाने सन्मानजनक जागा दिल्या तरच युती करू, अन्यथा स्वबळावर लढणार असे संकेत विनायक मेटे यांनी दिले आहेत.

विनायक मेटे म्हणाले की, येत्या काळात भाजपाकडून सन्मानजनक वागणूक मिळाली तर आम्ही युती करू. अन्यथा स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी आम्ही केली आहे. तसेच आगामी औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसंग्राम उतरणार आहे. युती झाली किंवा न झाली तरी येथे दोन आकडी नगरसेवक निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही विनायक मेटे यांनी केला.

दरम्यान, यावेळी औरंगाबादच्या नामांतरावरून विनायक मेटे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. केवळ सामनामध्ये किंवा सोशल मीडियात संभाजीनगर लिहिल्यामुळे शहराचं नामांतर होणार नाही. त्यासाठी नोटिफिकेशन काढावं लागतं. अस विनायक मेटे यांनी म्हंटल आहे.

Leave a Comment