Wednesday, February 8, 2023

अन्याय आणि ढोंगशाही विरुद्धचा तेजस्वी यादव यांचा संघर्ष यशस्वी झाला ; सामनातून तेजस्वी यादव यांचे कौतुक

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मतदानोत्तर एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार मोदी-नितीशकुमार यांचा पराभव होऊन बिहारमध्ये महागठबंधनचा दणदणीत विजय होऊन तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यातच आता बिहार निवडणुकीच्या निकालाविषयी सामनामधून राजद नेते तेजस्वी यादव यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे.

अमेरिका आणि बिहारची जनतेचं जेवढं अभिनंदन करू तेवढं कमीच आहे. जनता हेच सर्वात शक्तीमान आहे.जो बायडेन आणि तेजस्वी यादव यांचा संघर्ष, अन्याय, असत्य,ढोंगशाही विरुद्ध होता जो यशस्वी होताना दिसत आहे.पंतप्रधान मोदी व नितीशकुमार यांच्या सारखे नेते तरण्याबांड तेजस्वी समोर टिकू शकले नाहीत. खोटेपणाचे फुगे हवेत सोडले ते हवेतच गायब झाले.

- Advertisement -

लोकांनीच बिहारची निवडणूक हाती घेतली.त्यानी मोदी – नितीशकुमारला जुमानले नाही. तेजस्वीच्या सभेतून लाटा उसळत होत्या, तर मोदी-नितीश निर्जीव मडक्यासमोर घसे फोडत असल्याचे चित्र संपुर्ण देशाने पाहिले आहे.बिहारमध्ये जंगलराज येणार अशी परिस्थिती दाखवण्यात आली. मात्र लोकांनी स्पष्ट केलं की तुम्ही जा… जंगलराज आलाच तर आम्ही बघू  , असेही सामना अग्रलेखात म्हणल आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’