भाजपचे नाचे मंडळी जमिनीवर काठी आपटून साप साप करत बोंबलत फिरतात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपकडून शिवसेनेवर मुंबई कोविड सेंटर मधील घोटाळ्याचा आरोप करण्यात आल्या नंतर शिवसेनेनं सामना अग्रलेखातुन भाजपवर घणाघात केला आहे. मुंबईत अद्ययावत कोविड सेंटर्स उभारून लोकांना सेवा दिली जात आहे. लोकांचे प्राण वाचविले जात आहेत. यावरही भाजपाच्या काही नाचे मंडळींचा त्यावर आक्षेप असून ते जमिनीवर काठ्या आपटून ‘साप साप’ म्हणून बोंबलत फिरत आहेत,” अशी टीका शिवसेनेनं केलीय.

भाजपच्या नाचे मंडळींना नवाब मलिक यांनी कडक उत्तर दिले आहे. या नाचे मंडळींना गाय दूध देते हे दिसत नाही, तर फक्त शेण दिसते. खरेतर आता गाईच्या शेणातूनही अनेक ‘उपचार’ पद्धती सुरू झाल्या आहेत व शेणापासून इतर अनेक उपयुक्त उपक्रम संघ परिवाराच्याच गोशाळेत सुरू केले आहेत, या टोणग्यांना हे समजणार कधी? समाजाला लागलेली ही कीड आहे. चांगले चाललेले बघवले न जाण्याची पोटदुखी आहे. असे शिवसेनेन म्हंटल.

अमेरिकेसारख्या देशात करोनाचा विस्फोट होत आहे. आतापर्यंत तब्बल सहा कोटी नागरिक करोनाबाधित झाले असून आठ लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती नियंत्रणाखाली आहे. गंगेतील वाहत्या प्रवाहात करोनाग्रस्तांचे मृतदेह वाहताना जगाने पाहिले. गुजरातसारख्या राज्यात स्मशानात दोन दोन दिवस अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या होत्या. मुंबई-महाराष्ट्राने शर्थ करून असे विदारक चित्र घडू दिले नाही. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोविडची लढाई राज्यांनी पुढे न्यावी. देशाला लाभलेले सध्याचे आरोग्यमंत्री मनसुख मांडवियाही उत्तम काम करीत आहेत. निदान मुंबईतील भाजपाच्या नाच्यांनी त्यांना तरी अपशकून करू नये,” असं शिवसेनेनं म्हटलंय.