“बा भास्कर जाधवा…. जनता तुमचो ह्यो माज उतरवल्या शिवाय रव्हची नाय!” – महाराष्ट्र भाजप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
चिपळूण | प्रचंड पाऊस झाल्याने आलेल्या महापुरामुळे कोकणातील चिपळूण शहर हे पूर्णपणे अस्थिर झाले. जीवितहानी काही प्रमाणात झाली असून अनेक कुटुंब, संसार अडचणीत सापडले आहेत, मात्र, त्याच सोबत वित्तहानी ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे.
या अनुषंगाने आलेल्या आपत्तीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चिपळूण मध्ये दाखल झाले होते. त्यांनी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली व पूरग्रस्तांच्या अडचणी जाणून घेतल्या.  या पाहणी दरम्यान   एक महिला तिचे झालेले नुकसान हे मुख्यमंत्री यांच्या पर्यंत ऐकू जाईल एवढ्या आवाजात ओरडून सांगत होती. “तुम्ही आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार इकडे द्या, पण आमचे नुकसान तेवढे भरून द्या” असे सांगत होती.
मुख्यमंत्री स्वतः हे नीट ऐकून घेत होते, मात्र सोबत असलेल्या भास्कर जाधव यांना त्या महिलेचे शब्द काहीसे लागले आणि जाधव लागलीच त्या महिलेला प्रत्युत्तर देण्यासाठी पुढे आले. ”आमदार, खासदारांच्या पगाराने काही होणार नाही, चला चला, अरे आईला समजंव, आईला समजंव… ” असे रागाच्या भरात प्रत्युत्तर देऊन पुढे निघाले.
भास्कर जाधव यांच्या ह्या संतापमुळे संयमी, कुटुंब प्रमुख म्हणून परिचित झालेले मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यापेक्षा  जाधव यांचीच जास्त चर्चा सध्या रंगली आहे. त्याला महाराष्ट्र भाजपने खास कोकणी भाषेच्या शैली मध्ये ट्विट करत भास्कर जाधव यांच्या समाचार घेतला आहे.  “बा भास्कर जाधवा, आज हयसर तुया जी कोकण वासीयांवर जी अरेरावी केलंस मा? त्याका सत्तेचो माज म्हणतत! वाईच वेळ येऊ दे जनता तुमचो ह्यो माज उतरवल्या शिवाय रव्हची नाय! समजलंय मा?”

Leave a Comment