केंद्रात भाजप सरकार असून सावरकरांना अद्याप भारतरत्न का नाही? संजय राऊतांचा पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । ‘वीर सावरकर आमचे मार्गदर्शक आहेत. भाजप नेत्यांनी इतिहास चाळून पाहावा’ असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला लगावलाय. वीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत शिवसेनेची भूमिका कायम आहे. केंद्रात भाजप सरकार असून सावरकरांना अद्याप भारतरत्न का नाही ? असा सवाल
त्यांनी उपस्थित केलाय.काल झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केला होता. भाजपने सरसंघचालकांकडून हिंदुत्व शिकावे असा टोला त्यांनी लगावला होता. या पार्श्वभुमीवर पत्रकारांच्या प्रश्नावर राऊत बोलत होते.

सावरकरांच्या सन्मानासाठी शिवसेना जागरुक असल्याचे राऊत यांनी सांगितलं म्हणाले. सावरकरांवर ज्यांनी आक्षेपार्ह टीका केली त्यांना आम्ही उत्तर दिलंय असे देखील संजय राऊत म्हणाले. सावरकरांनी देशाचे नेतृत्व केले. अंदमानमध्ये तुरुंगवास भोगला. अशा सावरकरांबाबतीत केंद्र सरकार शांत का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

कोरोना प्रादुर्भावामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क ऐवजी जवळच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ५० जणांच्या उपस्थित घेण्यात आला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. दरम्यानं स्वातंत्र्यवीर विनायक सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजपकडून शिवसेनेवर टीका होत होती. या टीकेला संजय राऊतांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे. यावेळी मराठा आरक्षण संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलतील असे राऊतांनी स्पष्ट केले.

दरम्यान, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचे पाठ स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहातून देशाला सांगितले.मात्र, आमचा प्रश्न एकच आहे, काँग्रेस नेते सावरकरांसंदर्भात अपमानकारक भाषा बोलत होते त्यावेळी शिवसेना गप्प का होती?”, असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात झालेल्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला घेरले होते. त्यानंतर आता भाजप नेते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment