Wednesday, March 29, 2023

आदित्य ठाकरेंबाबत चंद्रकांत पाटलांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा राऊतांकडून समाचार म्हणाले…

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात एकीकडे नागरिक कोरोनाशी सामना करीत असताना. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर अनेक मुद्द्यांवरुन टीका करीत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. याला उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाटील यांचा चंगलाच समाचार घेतला आहे. चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे, त्यांच्यावर उपचाराची गरज आहे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते ठाणे येथे माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणले. तुम्हीच म्हणालात ना चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे. मग तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं. त्यांच्यावर उपचाराची गरज असते, अशी खोचक टीका राऊत यांनी केली.

- Advertisement -

चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य …

राज्यातील लॉकडाऊन बाबत निर्णय देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी कोरोना आणि 12 च्या परिक्षांबाबत उपाययोजना सुचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असं जनतेशी संवाद साधत असताना सांगितलं होतं. या मुद्यावरून चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आदित्यला लग्नाकरिता मुलगी पाहिजे आहे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवतील’ असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता.

फडणवीसांची टीका गंभीर घेत नाही

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचाही राऊत यांनी समाचार घेतला. फडणवीस माझ्यावरच निशाणा साधतील. त्यांची टीका मी गंभीरपणे घेत नाही. ते माझे मित्र आहेत. मित्रं राहतील. त्यांचं दु:ख मी समजू शकतो. माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली. ते सत्तेत येऊ शकले नाहीत. त्यामुळे ते दु:खी आहेत. पण माझ्यावर टीका करण्यात त्यांना आनंद वाटत असेल तर त्यांनी खुशाल टीका करावी. पुढील साडेतीन वर्षे टीका करून त्यांनी आनंद घ्यावा, असा टोला राऊत यांनी लगावला.

.